संविधानाची ओळख


    आपल्या संविधानाची ओळख






 कुटुंब,शाळा व आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. कुटुंबात वागण्याचे नियम नसतात.मात्र काही संकेत असतात .शाळेत गणवेश आणि अभ्यास याविषयी नियम असतात .गावाचा आणि शहराचा कारभार नियमांनी चालतो .याचप्रमाणे आपल्या देशाचा सुद्धा कारभार नियमांनी चालतो .देशाच्या कारभार संबंधी च्या तरतुदी एकत्रितपणे, सुसुत्रपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात .यात नागरिकत्व, नागरिकाचे हक्क,नागरिक व शासनसंस्था यांच्यातील संबंध,निवडणुका, राज्याचे अधिकार क्षेत्र यांच्या तरतुदी असतात .शासनाला नियमाच्या चौकटीत राहून नागरिकांच्या हक्काची सुरक्षितता , शासनाला मनमानी कारभार करता न येणे, जागतिक शांतता सुरक्षितता , मानवी हक्काची,नागरिकांची जबाबदारी यासाठी संविधान आवश्यक आहे .तसेच या पाठात संविधान निर्मितीची पार्श्वभूमी,संविधानसभा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

संविधान दिवस, गणराज्य दिवस, आणि संविधानाची वैशिष्टय या पाठात आपल्याला शिकायला मिळणार आहे.

प्रस्तुत घटक स्पर्धा परीक्षा साठी अत्यंत महत्वाचा आहे . परीक्षा देऊन सर्व विद्यार्थ्यांनी सर्व करावा.



Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement